अतिवृष्टीग्रस्त भागात बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश द्या; फडणवीसांची सरकारकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली । ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागणी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस आज हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यावर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही बाब निदर्शनास आणून दिली.

अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला असताना बँकांकडून शेतकऱ्यांना रोज फोन येत असून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्यांच्याकडे घरात खायला काही नाही ते कर्ज कसे फेडणार? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं. तसेच अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी तगादा लावला जात आहे. दिवसातून तीन चार वेळी शेतकऱ्यांना फोन केला जात आहे. अधिकारीही घरी येऊन कर्जासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला असून सरकारने अतिवृष्टग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्यावा. सरकारने अतिवृष्टी भागात कर्ज वसुली न करण्याचा पहिला आदेश काढावा. तसेच कर्ज वसुली करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. राज्यातील सर्व मंत्री फक्त येऊन माइकमध्ये बोलत आहेत. पण निर्णय कोण घेणार? शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णयच घेतला जात नाही. सरकारला गांभीर्य दिसत नाही. केवळ टिंगल टवाळी सुरू असून डायलॉगबाजीही सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment