दीदींच्या बंगालमध्ये कैलाश विजयवर्गी यांना CAAच्या समर्थनार्थ रॅली काढल्याबद्दल पोलिसांनी घेतलं ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीएएच्या समर्थनार्थ कोलकाता येथे रॅली काढल्याप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतलं. विजयवर्गीय यांच्याबरोबरच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आणि जय प्रकाश मजूमदार यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार CAAच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीची परवानगी घेतल्याशिवाय आयोजन करण्यात आले होते. परंतु याबाबत आपण अधिकाऱ्यांना माहिती दिली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पोलिसांनी ताब्यात घेत असताना, विजयवर्गीय यांनी पत्रकारांना सांगितले की, ”ममता बॅनर्जी सरकारने पश्चिम बंगालमध्ये निरंकुश राजवट सुरु आहे, परंतु त्या भाजपाला घाबरवू शकत नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “सीएएच्या समर्थनार्थ आम्ही एक रॅली काढत होते जिला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे, परंतु ममता बॅनर्जी यांचे पोलिस आम्हाला शांतता आणि लोकशाही मार्गाने सभा घेण्यास परवानगी देत ​​नाहीत,” ते म्हणाले. लोकशाही मार्गाने विरोध करण्यावर आपला विश्वास असल्याने आपण पोलिसांना ताब्यात घेण्यास विरोध करणार नसल्याचे विजयवर्गीय यांनी यावेळी सांगितले. परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल तिन्ही नेत्यांना व इतर समर्थकांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. परंतु या रॅलीबद्दल आपण पोलिसांना अगोदरच कळविले होते, असे भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment