हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमात झळकत असतानाच महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. औरंगाबादच्या नामांतरणाला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलंय. यामुळे महाविकास आघाडीतच ठिणगी पडली आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे.
आता भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका जिल्ह्याचं काय घेऊन बसलात, शिवसेनेची आताची परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्र्याना स्वतःचं नाव संभाजीनगर करायचं असलं तरी काँग्रेसला घाबरून नाव बदलणार नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
एका जिल्ह्याचं काय घेऊन बसलात, शिवसेनेची आताची परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्र्याला स्वतःचं नाव संभाजीनगर करायचं असलं तरी काँग्रेसला घाबरून नाव बदलणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 2, 2021
काँग्रेसची भूमिका नक्की काय –
आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’