हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सत्ताधारी आपल्या सरकारचे गोडवे गात असताना दुसरीकडे विरोधक मात्र सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरी वरून टीका करत आहेत. याच दरम्यान उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत असा आरोप भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे.
प्रकाश जावडेकर म्हणाले, राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, हे सरकार संधीसाधू सरकार आहे. पण मी या सरकारला महा विश्वासघातकी आघाडी सरकार नाव देतो असे त्यांनी म्हंटल. राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री 6 महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असं कोणतं राज्य आहे ? असा असा सवाल जावडेकरांनी केलाय.
दरम्यान तत्पुर्वी, राज्यातील भाजप नेत्यांनी देखील ठाकरे सरकार वर निशाणा साधला. दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची, बिनकामाची, मूर्खपणाची, ड्रग माफियाची, महिलांवर अत्याचाराची, हिंदू विरोधाची, शेतकरी व कामगारांना संपवण्याची, अर्थ व्यवस्थेला कीड लावण्याची, दंगली घडवण्याची आणि लाचारीची अस म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी सरकार वर ताशेरे ओढले