हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही अस विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. सगळ्या प्रश्नांचं अपयश झाकण्यासाठी आठ-दहा दिवसांतून असं वक्तव्य हे नियोजनद्ध पध्दतीने केलं आहे”, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. याच वक्तव्यावरुन दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “बदल्या, विकास कामांच्या निधीवरुन यांच्यात वाद होताना दिसत आहे. आपल्याकडेच फायदा व्हावा, अशा पक्षीय चढाओढीत महाराष्ट्राची जनता आणि विकासकामांकडे दुर्लक्ष होत आहे”, अशी टीका दरेकर यांनी केली.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण ?
“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’