हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळाव्या निमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजप नेतेही आक्रमक झाले आहे. काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो का ?? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
1/1.. मा.@OfficeofUT यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले मात्र आमचा प्रश्न एकच आहे #Cong नेते सावरकरां संदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्या वेळी शिवसेना गप्प क़ा होतीं ?
— Ram Kadam (@ramkadam) October 25, 2020
राम कदम यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “आज उद्धव ठाकरे हे सर्वांवर टीका करत असताना त्यांना सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेत्यांना चालतात का? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो? हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
1/2 .. आज @OfficeofUT हे सर्वांवर टीका करत असताना त्यांना सावरकराचा अपमान करनारे काँग्रेस नेते @RahulGandhi शिवसेना नेत्यांना का ठेवले नाहीत ? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो ? हा खरा प्रश्न ?
— Ram Kadam (@ramkadam) October 25, 2020
दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’