सातारा जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी मतदान करावे; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी प्रारंभ झाला. सातारा मतदार संघात भाजपचे नेते तथा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची आहे. “सातारा जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी सर्व मतदारांनी मतदान करावे. असे आवाहन करीत आमदार भोसले यांनी आम्हाला खात्री आहे कि सहकार पॅनलचे सर्वच्या सर्वच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान सातारा मतदार संघात भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु आहे. बँकेच्या प्रगतीसाठी सहकार पॅनलच्यावतीने उमेदवार निवडणुकीच्या रिगणात उतरले आहेत. त्या सर्वच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी मतदान करावे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1 हजार 964 मतदार आपला मतदानाचा हकक बजावणार आहे. या निवडणुकीसाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Leave a Comment