मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी मुस्लिमांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे अशी मागणी ठाकूर यांनी सरकार कडे केली आहे . या वक्तव्यानंतर बिहार भाजपाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागवलं आहे.

1947 मध्ये धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. त्यांना धर्माच्या आधारावर दुसरा देश मिळाला होता त्यामुळे त्यांनी तिकडे जायला हवे होते पण आता ते जर देशात राहत असतील तर त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करावा, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. ते दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून भारतात राहू शकतात.

ते पुढे म्हणाले, मुस्लिम लोकांना आयएसआयच्या अजेंड्याखाली भारताला इस्लामिक स्टेट बनवायचे आहे. हे लोक अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये काय करत आहेत हे सर्व पाहत आहेत. हे लोक मानवतेचे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून मतदानाचा हक्क हिरावून घेतला पाहिजे. ते अल्पसंख्याकही नाहीत. त्यांचा अजेंडा संपूर्ण जगाला इस्लामिक स्टेट बनवण्याचा आहे.