फक्त गोमूत्र प्यायल्यानेच कोरोनाला हरवता येईल ; भाजप आमदाराचा अजब दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लसीकरण करून देखील हवा तसा प्रभाव पडलेला दिसत नाही. याच दरम्यान कोरोनावर फक्त गोमूत्र पिणे हाच एक उपाय आहे असं अजब विधान भाजप आमदारांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी हा दावा केला असून “फक्त आणि फक्त गोमूत्र प्यायल्यानेच करोनाला हरवता येणं शक्य आहे”, असं ते म्हणाले आहेत.

सुरेंद्रसिंह यांनी 1 व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये सुरेंद्रसिंह स्वत: गोमूत्र पिताना दिसत आहेत. तसेच, गोमूत्र कसे प्यायले पाहिजे हे सांगतानाच त्यांनी “फक्त आणि फक्त गोमूत्रच करोनाला नियंत्रणात आणू शकेल”, असा दावा केला आहे. फक्त करोनाच नाही, तर इतरही अनेक आजारांवर गोमूत्र गुणकारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, गोमूत्र खरंच करोनावर उपचार म्हणून योग्य आहे का? याविषयी अद्याप कोणतंही वैज्ञानिक प्रयोगसिद्ध विश्लेषण मांडण्यात आलेलं नाही. त्यामुळे करोनाला हरवण्यासाठी फक्त गोमूत्रच उपयोगी पडू शकेल, असा दावा सुरेंद्रसिंह यांनी कशाच्या आधारावर केला? हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment