हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्धीसाठी राजकीय नेते काहीही करू शकतात . त्यांचा काही भरवसा नाही. हे आपल्याला कित्येक वायरल व्हिडिओ मधून लक्षात येते. मध्य प्रदेशाच्या रीवा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये स्वतः हा मिश्रा हे चक्क टॉयलेट साफ (cleans toilet) करताना दिसत आहेत आणि तेही हातात कोणतेही ग्लोव्ह्ज न घालता.
https://twitter.com/Janardan_BJP/status/1572955219750699011
मिश्रा यांचे या आधी देखील टॉयलेट साफ (cleans toilet) करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तो व्हिडिओ होता कोरोना काळातील कोविड केंद्रातील टॉयलेट घासून स्वच्छ केले होते. त्यावेळी त्यांनी किमान ब्रश तरी वापरला होता. पण यावेळेस मात्र ते चक्क हाताने टॉयलेट साफ करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांनी स्वतः देखील शेअर केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “भाजप पक्षाच्या सेवा सप्ताहाचा भाग संपून युवक मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा बालिका विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आणि याच विद्यालयतील शौचालयाची स्वच्छता (cleans toilet) केली.” सध्या या व्हिडिओवर काही लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही लोकांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार