शिवसेनेची हूकुमशाही बरोबर नाही; नवणीत राणाचं कंगणा प्रकरणावर ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोड चालवल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळया प्रतिक्रिया येत आहेत. अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांनी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे.

सत्तेच्या लालसेपोटी आपल्या शक्तीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राणा यांनी बीएमसीवर केलाय. बीएमसी शिवसेनेकडे आहे. ही हुकुमशाही चांगली नाही अशा आशयाचं ट्विट राणा यांनी केलंय. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून ही कारवाई होण्याआधी काल भाजपाचे मुंबईतील आमदार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन ‘मातोश्री’च्या जवळ असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

“मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर वांद्रे पूर्वमध्ये असलेलं हे अनधिकृत बांधकाम महापालिकेला दिसत नाही ? कदाचित हे सरकारचे जावई असावेत. पण कंगना रणौतच घर आणि कार्यालयाचं अनधिकृत बांधकाम शोधण्यासाठी महापालिकचे अधिकारी पोहोचले” असे अतुल भातखळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment