कोल्हापूर । मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, अशा शब्दात भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांचं नाव न घेता सुनावले आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी यांनी ट्विट करून सारथी संस्थेच्या वादावर भाष्य केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं कि, ”मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही.”
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने सारथी संस्थेचे प्रश्न निकाली निघत नसल्याने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यामुळे आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर संभाजी राजे यांनी नाव न घेता वडेट्टीवार यांचे कान टोचले आहेत.
मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही.
(1/2)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”