१० ते २ वाजण्याच्या दरम्यान काळात कोरोना होत नाही का? खासदार उदयनराजेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी आज साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. कोरोना महामारीवर सामूहिक प्रयत्नांद्वारे करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह व अन्य तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर निदर्शनास आलेल्या काही गोष्टी उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढं मांडल्या. ‘लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्याचा पर्याय नव्हे. तसं असेल तर मग काही तास शिथिलता कशी दिली जाते? त्या काळात कोरोना होत नाही का?,’ असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.

लॉकडाऊनमुळं अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. लोकांचे रोजगार गेले आहेत. चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळं लस लवकरात लवकर मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाबींसाठी १० ते २ वाजण्याच्या दरम्यान काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या सूचना:

१) सातारा जिल्ह्याकरीता टास्क फोर्स स्थापित करणे.

२) एफसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे.

३) शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची कार्यक्षमता जास्तीत जास्त उपयोगात आणणे.

४) कोणतेही लक्षण नसलेल्या कोविड रुग्णांना घरच्या घरी उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे

५) शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडिसिन असलेल्या फिजीशियन्सची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे.

६) सर्वसाधारण रुग्णालय फक्त कोविड-१९ च्या रुग्णांसाठी समर्पित करणे व अन्य रोगाचे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारार्थ पाठविणे.

७) डब्ल्यूयुआययडी टास्क फोर्स समितीने सुचवल्याप्रमाणे रुग्णांना डिस्चार्ज देणेबाबत धोरण ठरवणे.

८) कोविड वगळता इतर रुग्णांसाठी आर्यांग्ल हॉस्पिटलचा पर्याय निर्माण करून तो पर्याय राबविणे.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/1807508629388305

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment