हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ? असा सवाल राणेंनी केला आहे.
याबाबत नितेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना.. तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असे ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
जाऊन सांगा आज सेना भवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..
तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे..
मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ??
मानले @BJYM4Mumbai ला !!— nitesh rane (@NiteshNRane) June 16, 2021
काय आहे प्रकरण –
अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही वेळातच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसैनिकांची बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. महिला कार्यकर्त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण झाल्याने वातावरण तापले. यावेळी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.