हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आता पलटी मारली आहे. मी अस बोललोच नसून माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरीही यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.
प्रसाद लाड म्हणाले, आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही.
शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही!
प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..! pic.twitter.com/kMo8TuAD5V— Prasad Lad (@PrasadLadInd) July 31, 2021
माझं स्पष्ट म्हणनं होतं की, माहिममध्ये जेव्हा येतो तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त ठेवला जातो की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे.माझं हे स्पष्टीकरण आहे, मला कुठल्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बाधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणाले.