हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढता कोरोनाचा धोका पाहता यंदा सलग दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच तेथील काही गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे असं दरेकर म्हणाले आहेत.
वारकऱ्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा भूमिका मांडली. परंतु आता हे सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे किंबहुना त्यांच्या संवेदनाच गोठल्या आहेत. यांच्या संवेदना असत्या तर आज आमची मंदिरं, देव-दैवतं कुलुपात राहिली नसती. यांनी काँग्रेसशी हात मिळवणी करून, आपले देव, देश, धर्म सगळं काही बासनात गुंडाळलं आहे. ेक” असं दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे.
या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत. अकलुज येथे माध्यमांशी साधलेला संवाद..! pic.twitter.com/1BV7FZv1ad— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 15, 2021
जे मंदिराला टाळे लावू शकतात त्यांना वारकऱ्यांबद्दल किती काळजी असणार असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले, वारकरी देखील तयार होते की आम्ही सर्व निर्बंध पाळू, संख्येचे निर्बंध पाळू परंतु हेकेखोरपणे आम्हाला पाहिजे तसंच वागू, अशाच पद्धतीने वारकऱ्यांशी देखील सरकारचं वागणं राहिलेलं आहे.