अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा ; राम कदमांचे जाहीर आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी याना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजप चांगलीच आक्रमक झाली असून त्यांनी अर्णब गोस्वामी याना समर्थन दिलं आहे. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे.

राम कदम यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घेणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी राम कदम यांनी अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते. तसेच अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते. अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment