म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ५ हजार पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राजकारण जय श्रीराम च्या मुद्दयांवर चांगलेच तापणार असल्याचे चित्र सध्या अमरावती मध्ये पाहण्यास मिळते आहे. अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणावर आक्षेप घेतला होता. त्या घटनेचा निषेद म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना जय श्रीराम लिहलेली पाच हजार पत्र पाठवणार आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘आशा’ शुभेच्छा कि मोदींनाही नाही अवरले हसू

संसदेत भाजपचे खासदार लोकसभा सदस्यांना शपथ देते वेळी जय श्रीरामाच्या घोषणा देत होते. त्यावर नवनीत राणा यांनी आक्षेप घेत जय श्रीरामच्या घोषणा देण्याची हि जागा नाही. तुम्हाला घोषणा द्यायच्या आहेत त्या साठी मंदिरे आहेत. तेथे जाऊन तुम्ही जय श्रीरामाच्या घोषणा द्या असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. या वक्तव्याचा राग मनात धरून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना जय श्रीराम लिहलेली पाच हजार पत्र पाठवणार आहेत.

वर्धापन दिनी मुख्यमंत्री शिवसेनेला देणार ‘हि’ खुशखबर

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे. तर, भारतातील बहुसंख्य नागरिकांचे श्रद्धास्थान श्रीराम आहेत, त्यांच्या उच्चाराने खासदार नवनीत राणा यांना कसला त्रास झाला? हे नवनीत राणांनी स्पष्ट करावं, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला.

आणि तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष एका मताने निवडणूक हारले

विरोधकांपेक्षा खडसेच सरकारवर अधिक संतापले

लोकसभेच्या सभापतींनी स्वीकारला पदभार

एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केले शिक्षिकेवर चाकूने सपासप वार

पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच ; उद्धव ठाकरेंची भीष्म प्रतिज्ञा

Leave a Comment