सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत असा टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना लगावल्यानंतर शिवेंद्रराजेंनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचं घर फोडल आहे हे त्यांनी दाखवावं अस म्हणत ज्यांना कोणाला यायचंय आणि ताकद आजमावायची आहे त्यांनी आजमावी, असे आव्हान त्यांनी शशिकांत शिंदे यांना दिले.
शिवेंद्रराजे म्हणाले, मी कुणाचं घर फोडल आहे हे त्यांनी दाखवावं माझ्यावर तसा कोणताही गुन्हा दाखल नाही.. आम्ही जनतेच्या मनातल्या राजे आहोत आम्ही लोकशाही मानतो, राजा विरुद्ध प्रजा हा डायलॉग निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.. शशिकांत शिंदे यांनी कंबर कसली असली तरी माझी काही हरकत नाही माझी अजून कंबर आणि मणके चांगले आहेत.. सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघात ज्यांना कोणाला यायचंय आणि ताकद आजमावायची आहे त्यांनी आजमावी, लोकशाही आहे असे सांगत एकप्रकारे आव्हान दिले आहे.
शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले होते-
काही लोकांना राजकारणातील माझा अडसर वाटायला लागला होता, जिल्हा आपल्याच हातात असावा अशी मानसिकता झाली होती त्यामुळेच त्यांच्या रसत्यातील माझा अडसर घालवण्यासाठी निवडणुकीत प्रयत्न करण्यात आला असे म्हणत शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला. तसेच आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत,असा घणाघात शिंदे यांनी केला होता.