भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त 6 हजार 200 काढ्याचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील विविध भागांतील नागरिकांना इम्युनिटी बूस्टर काढ्याचे वाटप करण्यात आले. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, कोरोनाच्या विकट परिस्थितीतून जात असताना प्रत्यकाने आपली सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शिवछत्रपती ट्रस्ट आणि जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गरिबांच्यासाठी अन्नधान्य वाटप असो की इतर मदत गेल्या लाटेत आणि यावेळीही त्यांनी पुढाकार घेऊन केलेले कार्य खूप मोलाचे आहे. चंद्रकांत दादांच्या 62व्या वाढदिवस निमित्ताने 6200 रोग प्रतिबंधक शक्ती वाढविण्याच्या काढ्याचे वाटप होत आहे. याची खरच समाजाला गरज आहे.

सुरुची या निवासस्थानी इम्युनिटी बूस्टर काढा वाटपाचा शुभारंभ आ. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र पवार, जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व भाजप गटनेत्या, पक्षप्रतोद सौ. सिद्धी पवार, भाजपचे शहर अध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक अविनाश कदम प्रकृतीचे सुयोग दांडेकर, उद्योजक मंगेश जाधव, कट्टा ग्रुपचे सदस्य संकेत परामणे, धनंजय खोले, चैतन्य गायकवाड, अभय बाजारे, डॉ. अथर्व दांडेकर, वैभव कदम, ज्ञानेश्वर चौगुले व इतर सभासद उपस्थित होते.

Leave a Comment