फट..फजिती! भाजपच्या कृषी कायद्याच्या जाहिरातीचा ‘पोस्टर बॉय’ शेतकरी आंदोलनात सहभागी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपच्या जाहिरातीतील शेतकरीही आहे. यामुळे भाजपवर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरू आहे. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही सहभागी झाले आहेत. कमालीची बाब म्हणजे पंजाबमध्ये भाजपच्या कृषी कायद्यांच्या जाहिरातीत हरप्रीतसिंग यांचा फोटो आहे. तेच हरप्रीतसिंग या नवीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. भाजपने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला आहे, असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

हरप्रीत हे पंजाबमधील होशियारपूरचे रहिवासी आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहे आणि कलाकारही आहेत. हा फोटो आपण ६-७ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भाजपच्या जाहिरातीत हा फोटो वापरण्यात आला आहे, असं एका मित्राने व्हॉट्अपवरील चॅटमधून आपल्याला सांगितलं. फोटो वापरण्यापूर्वी आपली परवानगी घेतली गेली नाही. आता अनेक आपल्याला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणून संबोधत आहेत. पण आपण भाजपचे नाही तर शेतकर्‍यांचे पोस्टर बॉय आहोत, असं ते सांगत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलनाला बसलो आहे. भाजपची जाहिरात आणि आपल्या मूळ फोटोसह भाजपला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं ३५ वर्षीय हरप्रीत सिंग यांनी सांगितलं.

8ajbv4mo

पंजाब भाजपची जाहिरात…
या जाहिरातीमधून किमान आधारभूत किमतीवरून (MSP) शेतकऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही जाहिरात भाजपच्या पंजाब युनिटने सोमवारी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या जाहिरातीच्या एका कोपऱ्यात एक पंजाबी शेतकरी फावडं हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो फोटो हरप्रीत सिंग यांचा आहे. हा फोटो जवळपास ७ वर्षांपूर्वीचा होता आणि भाजपाने परवानगीशिवाय सोशल मीडिया पेजवरून हा फोटो घेतला आहे, असं हरप्रीतसिंग म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment