विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत; मग शिंदे-दादा गटाला किती??

mahayuti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा आगामी विधासभा निवडणुकीकडे (Maharashtra Assembly Election 2024) लागल्या आहेत. येत्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती असा थेट सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे भाजपला इतक्या जागा सोडलं शिंदे आणि दादा गटाला मान्य असणार का ते पाहायला हवं.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची तयारी भाजपची असल्याचे समजते. तर महायुतीमधील अन्य तीन मित्रपक्षांना उरलेल्या 15 जागा मिळतील.. या ३ मित्रपक्षांमध्ये आरपीआय आठवले गट, मनसे, रयत क्रांती संघटना यांचा समावेश असू शकतो. भाजपला सर्वाधिक जागा देणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे याना मान्य असणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण यापूर्वी अजित पवार गट आणि शिंदे गटाने भाजपकडे प्रत्येकी ९० जागांची मागणी केली होती.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघडीचे महायुतीचा दारुण पराभव केला होता. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघापैकी महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या तर दुसरीकडे महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळालं. यात भाजपला ९, शिंदेंच्या शिवसेनेला ७ आणि अजित पवार गटाला एका जागेवर विजय मिळाला. त्यामुळे लवकरात लवकर विधानसभेचं जागावाटप करून कामाला लागण्याचा महायुतीचा विचार आहे.