हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता, याच निवडणुकीसाठी मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजप लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजपच (BJP) लढल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मान्य केला आहे. त्यामुळे शिंदे गटातील उमेदवारांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, भाजप पाच जागांवर लढल्यानंतर शिवसेनेच्या हाती दक्षिण-मध्य ही एकमेव लोकसभेची जागा येईल. या जागेसाठी शिवसैनिककडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. परंतु यापूर्वी दक्षिण मध्यबरोबर उत्तर पश्चिम जागेसाठीही शिवसेनेकडून दावा करण्यात येत होता. आता मात्र ही जागा भाजपला देण्यासाठी शिवसेनेने होकार दिला आहे. त्यामुळेच आता मुंबईतील पाच मुख्य जागांसाठी भाजपचे उमेदवार उभे राहणार आहेत. आता हे उमेदवार नेमके कोण असतील? याची माहिती पुढे काही दिवसांमध्ये सांगितली जाईल.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपच्या झालेल्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत महायुतीत भाजप 30 जागांवर लढेल, शिवसेना 12 जागांवर आणि अजित पवार सहा जागांसाठी लढेल , अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच महायुतीत जागा वाटपाचा फॉर्मुला 30 12 6 असा ठरवण्यात आला आहे. परंतु अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा महायुतीच्या पक्षांकडून करण्यात आलेले नाही.