लाडक्या बहिणींना 2500 रुपये देणार; भाजपची सर्वात मोठी घोषणा

0
1
BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hello Maharashtra Online : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये महिलांना दर महिन्याला २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन देखील भाजपकडून देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष भाजपच्या या जाहीरनाम्याकडे वेधले गेले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जाहीरनामा सादर करताना सांगितलं की, हा जाहीरनामा दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरेल. तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जाहीरनाम्याचं रूपांतर संकल्प पत्रात केल्याचेही नमूद केलं. ते म्हणाले, “२०१४ मध्ये भाजपाने दिलेली ५०० पैकी ४९९ आश्वासनं पूर्ण केली आहेत. मोदी सरकारमुळे २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. दिल्लीतील सध्याच्या कल्याणकारी योजना भाजप सरकार आल्यानंतरही सुरू राहतील.”

भाजपकडून या योजनाही जाहीर

महत्वाचे म्हणजे, महिलांसाठी भाजपाने जाहीर केलेल्या योजना महत्त्वाच्या ठरल्या आहेत. गरोदर महिलांना २१ हजार रुपयांची मदत, होळी आणि दिवाळीच्या महिन्यात मोफत गॅस सिलिंडर, तसेच एलपीजी सिलिंडरसाठी ५०० रुपयांची सबसिडी देण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. भाजपाने झोपडपट्टीवासीयांसाठीही ‘अटल कँटीन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांना फक्त पाच रुपयात भोजन दिले जाणार आहे. यासह गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जाईल.

दरम्यान या सगळ्यांमध्ये भाजपने लाडक्या बहिणींसाठी घोषित केलेल्या आर्थिक मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने मागील निवडणुकी वेळी हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला होता. लाडकी बहिर योजनेचा फायदा हा भाजपला निवडणुकीमध्ये झाला. आता भाजप याच फॉर्मुलाच्या आधारे दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आहे.