हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता अयोध्यला जाणे आणखीन सोप्पे होणार आहे. कारण भाजपकडून अयोध्येसाठी एकूण 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. राज्यातील जनतेला श्री रामचे दर्शन घेण्यात यावे यासाठी भाजपने “चलो अयोध्या” अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गतच अयोध्येसाठी 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर राम भक्तांना अयोध्येला नेण्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. यासाठी भाजप चलो अयोध्या अभियान ही मोहीम राबविणार आहे. या अभियानाची संपुर्ण जबाबदारी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या अभियानामुळे सर्वसामान्य जनतेला रामललाचे सहज दर्शन घेता येणार आहे. कारण, विशेष रेल्वे भक्तांना थेट अयोध्येत सोडवेल.
दरम्यान, रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतरच महाराष्ट्राच्या विविध भागातून अयोध्येपर्यंत 36 रेल्वे धावणार आहेत. या विशेष रेल्वेच्या माध्यमातून राम भक्तांना अयोध्येला जात येईल. महाराष्ट्रातून या मोहिमेची जबाबदारी संजय पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेचा एकच हेतू असेल तो म्हणजे, राम भक्तांना अयोध्येला पोहचवणे. ज्यामुळे त्यांचा आयोध्येला जाण्याचा मार्ग सोपा होईल.