बीड जिल्ह्यात भाजपने खाते उघडले !!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. अशातच आता बीडमध्ये देखील भाजपने आपलं खातं उघडलं आहे. गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार आणि केजमधून नमिता मुंदडा यांनी विजय मिळवत भाजपचं बीडमधील खातं उघडलं आहे.

बीड जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी केज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चर्चेत होती. राष्ट्रवादीन उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढली. त्यांनी केजमधून विजय मिळवला आहे.

बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांनी २७५९ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे १५११४ मतांनी आघाडीवर आहेत. माजलगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके १३३४८ मतांनी आघाडीवर आहेत.

 

 

Leave a Comment