सोलापूरसाठी भाजपचा हा उमेदवार निश्चित ?

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर लोकसभेसाठी अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. जयसिद्धेश्वर यांची उमेदवारी भाजपकडून अजून जाहीर झाली नसली तरी त्यांच्या नावावर निर्णय झाला आहे.

अक्कलकोट येथे काँग्रेस कडून सुशील कुमार शिंदे लढणार आहेत. त्यामुळे अक्कलकोट येथे जयसिद्धेश्वर यांची लढत सुशील कुमार शिंदे यांच्याशी होईल. अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी परिचित आहेत. उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढवू असे जयसिद्धेश्वर यांनी सांगितले. उमेदवारीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तसेच इतर भाजप वरिष्ठ नेत्यांची भेट घ्यायला सुरत केली आहे.

जयसिद्धेश्वर यांच्या उमेदवारीमुळे सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. महाराजांचे शैक्षणिक काम, मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि भक्तांची संख्या पाहता महास्वामीजींचे पारडे जड मानलं जातं आहे.

 

इतर महत्वाचे –

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरते, नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या बैठकीकडे पाठ

सांगलीत संजय पाटील अडचणीत, उमेदवारास पक्षाच्याच आमदारांचा विरोध