Black Rice Benefits | मधुमेह आणि हृदयरोगींसाठी काळा तांदूळ आहे वरदान; होतात अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Black Rice Benefits | आपल्या देशामध्ये भात शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे . अनेक लोक हे भात शेती करतात. त्यामुळे तांदूळ हा आपल्या देशातील एक प्रमुख आहार आहे. अनेक लोक असे आहेत, ज्यांचे भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही. कोणतीही थाळी घ्यायची असेल, तरी भाताशिवाय ती थाळी पूर्ण होत नाही. अनेक लोक हे सामान्यता पांढरा भात खातात. परंतु असे म्हणतात की, हा भात चवीला कितीही चांगला लागत असला, तरी आपल्या आरोग्यासाठी थोडा हानिकारक असतो. कारण जास्त भात खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहत नाही.

यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. कारण आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त कर्बोदके असतात. परंतु जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तरी देखील तुम्हाला भात खाण्याची इच्छा पूर्ण करायची असेल, तर तुम्ही ब्राऊन राईस (Black Rice Benefits) खाऊ शकता. हा तुमच्या आरोग्यासाठी एक अत्यंत आरोग्यदायी पर्यायी मानला जातो. आजकाल काळा तांदूळ खाण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पांढरा तांदळाच्या मान्याने काळा तांदूळ हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. आता या काळात तांदळाच्या आपल्या आरोग्याला काय फायदा होतो हे आपण जाणून घेऊया. .

काळा तांदूळ काळा का असतो ? | Black Rice Benefits

काळ्या तांदळामध्ये अँथोसायनिन नावाचे एक रंगद्रव्य असते. ज्यामुळे तांदळाला काळा रंग प्राप्त होतो हे एक चांगले अँटिऑक्सिडंट आहे. त्यामुळे तांदळाचा रंग काळा होतो.

काळ्या तांदळाचे फायदे

पांढऱ्या तांदळापेक्षा काळा तांदूळ हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्व, अमिनो ऍसिड आणि इतर अनेक खजिने असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. यासोबतच काळ्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून देखील आराम मिळतो. काळ्या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात राहते आणि तुमची पचनशक्ती सुधारते. तसेच काळा तांदूळ हा हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा मानला जातो.

काळ्या तांदळामध्ये (Black Rice Benefits) भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरीराला तणावापासून दूर ठेवतात. एक्सीडेंट तणावामुळे कर्करोगासारखा आजार होतो. त्यामुळे काळ्या तांदळाचे कर्करोगापासून संरक्षण होते. काळ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 42 ते 50 या दरम्यान असतो. त्यामुळे साखरेची आपल्या शरीरातील पातळी वाढत नाही. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हा भात अत्यंत फायद्याचा मानला जातो. तसेच जर तुमचे वजन नियंत्रणात आणायचे असेल आणि तरी देखील तुम्हाला भात खायचा असेल, तर तुम्ही जेवणात काळ्या तांदळाचा समावेश करू शकता.