Black Salt – रोजच्या आहारात काळं मीठ खाताय? होतील ‘असे’ गंभीर परिणाम; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Salt) आपला आहार जितका पूर्ण आणि सकस असेल तितका आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतो. कारण आहारातून आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळत असतात. ज्यामुळे निरोगी आयुष्य आणि सुदृढ शरीर प्राप्त होते. आपल्या रोजच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ.

मिठाशिवाय जेवण अळणी लागते तर जास्त मीठ झाल्यास खारट. पण मिठाची मात्रा योग्य असेल तर अन्नपदार्थाची लज्जत वाढते. अनेक लोक दैनंदिन आहारात पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर करतात. जो अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मात्र काळ्या मिठाचा अतिरिक्त वापर आयोग्यासाठी धोका निर्माण करू शकतो. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या लोकांच्या घरात हमखास काळ्या मिठाचा वापर होताना दिसतो. काळे मीठ वापरणे अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. काळ्या मिठातील अँटीऑक्सीडेंट आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांपासून लांब ठेवतात. तसेच काळे मीठ पोटासाठी फायदेशीर मानले जाते. (Black Salt) काळ्या मिठाचे असे अनेक फायदे सांगितले जातात. पण तुम्हाला काळ्या मिठामुळे आपल्या शरीरावर होणारे घटक परिणाम यांविषयी कल्पना आहे का..? नसेल तर हि बातमी पूर्ण वाचा आणि जाणून घ्या.

काळ्या मिठामुळे होते शरीराचे नुकसान (Black Salt)

काळ्या मिठाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेसुद्धा आहेत. हे पूर्णपणे काळ्या मिठाचे सेवन किती प्रमाणात केले जाते यावर अवलंबून आहे. (Black Salt) साहजिकच जी व्यक्ती या मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करत असेल ती व्यक्ती स्वतःहून आपले आरोग्य खराब कात आहेत. खरंतर या संदर्भात वैज्ञानिक संशोधनाचा अभाव आहे. त्यामुळे बहुतेकदा काळ्या मिठाचे केवळ फायदे सांगितले जातात. मात्र काही तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, काळ्या मिठाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

1) मळमळ आणि उलटी –

काळ्या मिठाचे जास्त सेवन केल्यास मळमळणे, चक्कर येणे आणि उलट्या होणे यासह अन्य काही गंभीर परिस्थिती उदभवू शकते. या सगळ्याने अत्यंत त्रासदायी डोकेदुखी होते. अशावेळी काळ्या मिठातून पोटात गेलेले अधिक सोडियम शरीराबाहेर काढण्यासाठी साधे पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. (Black Salt)

2) उच्च रक्तदाब –

काळे मीठ शरीरातील पाणी धरून ठेवते. त्यामुळे काळ्या मिठाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. काळ्या मिठाचे अधिक सेवन केल्यास रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर अतिरिक्त दबाव निर्माण होतो आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. (Black Salt) अशा परिस्थितीत त्वरित तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घ्यावा.

3) हृदयरोग –

काळ्या मिठाचे सेवन नियमित स्वरूपात अधिक सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. जो हृदय रोग होण्याची शक्यता दर्शवतो. त्यामुळे काळे मीठ नियमित आहारात वापरत असाल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला जर घ्यावा. (Black Salt)

4) मूत्रपिंड संबंधित समस्या –

मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांसाठी काळ्या मिठाचे अती सेवन कारणीभूत ठरू शकते. कारण काळ्या मिठाचे अधिक सेवन मूत्रमार्गात समस्या निर्माण करतात. ज्यामुळे किडनी रोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग विकसित होतात. त्यामुळे एकवेळ अळणी खा पण मिठाचे प्रमाण अधिक होता काम नये.

5) स्ट्रोक –

काळ्या मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे नियमित स्वरूपात काळे मीठ खाणाऱ्या व्यक्तीला स्ट्रोकचा धोका संभवतो.

6) कोलन कर्करोग –

काळ्या मिठात सोडियमची मात्रा अधिक असते. ज्यामुळे काळ्या मिठाचे सेवन केले असता शरीरातील सोडियम लेव्हल वाढते. तसेच काळ्या मिठात आढळणारे केमिकल्स कोलन कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. (Black Salt)