Black Sand Beach : जगातील ‘या’ सुंदर समुद्रकिनारी फिरतं मृत्यूचं सावट; जीव मुठीत घेऊन फिरतात पर्यटक

Black Sand Beach
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Sand Beach) आजपर्यंत तुम्ही अनेक समुद्र किनारे फिरला असाल. लांबलचक किनारे, फेसाळणाऱ्या लाटा आणि आभाळ टेकलेले त्याचे टोक पहायला फारच सुंदर वाटते. त्यामुळे जगभरातील अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. आजपर्यंत तुम्ही अनेक समुद्रकिनारे पाहिले असाल फिरले असाल. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमध्ये पाय रोवून निवांतपणे बसले असालं. पण तुम्ही कधी काळया वाळूचा समुद्रकिनारा पाहिलाय का? होय. काळया वाळूचा समुद्रकिनारा.

जगातील अनेक समुद्रकिनाऱ्यांबाबत तुम्हाला माहिती असेल. पण हा काळया वाळूचा समुद्र किनारा इतरांपेक्षा फार वेगळा आहे. इथली काळी वाळू या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्य आहे. मात्र हा समुद्र किनारा काळ्या वाळूसाठी नव्हे तर दुसऱ्याच एका गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं कि, या समुद्र किनाऱ्यावर मृत्यूचं सावट आहे. चला तर जाणून घेऊया या जीवघेण्या समुद्राबाबत काही खास गोष्टी.

कुठे आहे हा समुद्रकिनारा? (Black Sand Beach)

साऊथ आइसलॅण्ड किनारपट्टीवर वसलेल्या राजधानीच्या रेक्जाविक शहराजवळ हा काळ्या वाळूचा समुद्र किनारा आहे. या समुद्रकिनाऱ्याचे नाव रेनिस्फजारा असे आहे. रेक्जाविक शहरापासून १८० किलोमीटर दूर आहे. या समुद्रकिनाऱ्याची खासियत इथली काळ्या रंगाची वाळू आहे. अनेक पर्यटक हा समुद्र किनारा पाहण्यासाठी लांबून येत असतात. मात्र हा समुद्रकिनारा फार धोकादायक असल्याचे बोलले जाते. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा हा समुद्र किनारा धोकादायक का आहे? याबाबत जाणून घेऊया.

काळ्या वाळूचा जीवघेणा समुद्रकिनारा

या बीचवर पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांच्या दाव्यानुसार, या समुद्र किनाऱ्यावर मृत्यूचं सावट आहे. एका वृत्तानुसार, रेनिस्फराजा या काळ्या रेतीच्या समुद्र किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा काहीच अंदाज देता येत नाही. या लाटांचा आवेग इतका भयंकर असतो कि, या लाटांच्या विळख्यात सापडणारा माणूस जिवंत वाचणे कठीणचं!! यामुळे हा समुद्र किनारा धोकादायक मानला जातो. (Black Sand Beach)

रेनिस्फराजावरील स्निकर लाटांमुळे हा बीच देशातील सर्वात धोकादायक असल्याचे सांगितले जाते. या लाटा फारच प्रभावी आणि शक्तीशाली असतात. ज्या कधीही, कुठेही निर्माण होतातया आणि किनाऱ्यावर येऊन आढळतात. या लाटांची काही काळ वेळ ठरलेली नसते. त्यामुळे एखाद्याला या लाटेने आलिंगन दिल्यास मृत्यू निश्चित मानला जातो. (Black Sand Beach) या धोकादायक स्निकर लाटांसंदर्भात इशारा देणारे अनेक बोर्ड या बीचवर लावले आहेत. या लाटांमुळे हा समुद्रकिनारा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडू शकते. त्यामुळे किनाऱ्यावर लावलेल्या सूचनांचे पर्यटकांनी पालन करणे बंधनकारक आहे.

हा समुद्रकिनारा इतका धोकादायक असूनही इथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. याचे कारण म्हणजे इथली काळी रेती आणि दूरवर पसरलेल्या समुद्राचे नैसर्गिक सौंदर्य. या समुद्रकिनाऱ्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या किनारपट्टीच्या पूर्वेला भल्या मोठ्या आकारातील बेसॉल्ट खडकापासून तयार झालेले काही डोंगर आहेत. जे स्तंभासारखे दिसतात आणि लक्ष वेधून घेतात. इतका सौंदर्याने नटलेला हा समुद्रकिनारा केवळ बेसावध लाटांच्या धोक्यामुळे इथल्या पर्यटकांसाठी जीवघेणा ठरतो. (Black Sand Beach)