नागपूर समृद्धी महामार्गावर काळविटांची लागली ‘शर्यत’

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. हा महामार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पण, सुपरफास्ट अशा समृद्धी महामार्गावर काळविटांचा (blackbuck)वावर पाहण्यास मिळाला आहे. दोन काळवीट (blackbuck) समृद्धी महामार्गावर मुक्तपणे धावत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या महामार्गामुळे आता नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ 7 तासात गाठता येणार आहे. या महामार्गाच विदर्भातील काम पूर्ण झालं आहे. या महामार्गगाचे अजून उदघाटन झालेले नाही म्हणून या महामार्गावर वाहतूक बंद आहे. पण सोशल माध्यमावर या महामार्गावरून काळवीट (blackbuck) धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जणूकाही काळविटाची (blackbuck) शर्यतच या महामार्गावर लागलेली आहे.

हा व्हिडीओ अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील आहे. समृद्धी महामार्गावर प्राणी येऊ नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा 15 फुटांची भिंत उभारण्यात आली आहे. असे असतानासुद्धा महामार्गावर प्राणी (blackbuck) आले तरी कुठून? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न या ठिकाणी निर्माण झाला आहे. तसंच वन प्राणी जर महामार्गावर येत असतील तर त्यांच्या जीवालासुद्धा धोका निर्माण झाला आहे.

हे पण वाचा :
घसरत्या बाजाराची येत्या आठवड्यात वाटचाल कशी राहील ???

नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले

भिवंडीमध्ये सडलेल्या फळांचा ज्युस विकत होता फळ विक्रेता, किळसवाणा व्हिडिओ आला समोर

आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्याने केले ‘हे’ कौतुकास्पद काम