व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका नवरदेवाला आपल्या लग्नाचा अतिउत्साह महागात पडला आहे. त्यासाठी त्याला तब्बल 2 लाखांचा दंड (Fine) बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या वरात घेऊन लग्नाच्या मंडपाच्या दिशेने जात होता. यादरम्यान नवरदेव कारच्या छतावर बसून डान्स करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आपल्या महागड्या कारच्या खुल्या छतावर डान्स करताना दिसत आहे. या घटनेची दखल घेत वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत थेट 2 लाखांची पावती (Fine) फाडली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, ऑडी गाडीतून निघालेला नवरदेव मुजफ्परनगर-हरिद्वार मार्गावर स्टंट करीत जात होता. मुजफ्परनगर येथील गर्दीच्या ठिकाणी नवरदेव ऑडी कारच्या खुल्या छतावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आणखीही बरेच पाहुणे कारच्या खिडकीला लटकताना दिसत आहेत.

एकूण 9 कारना बसला 2 लाखांचं दंड…
यादरम्यान एका व्यक्तीने लग्नापूर्वीचा हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. याशिवाय त्याने स्थानिक पोलिसांना टॅग करीत ट्विटदेखील केलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी याची दखल घेत या वरातीतील एकूण 9 कारवर कारवाई (Fine) केली.

हे पण वाचा :
हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल

मोदींच्या आईचे 100 व्या वर्षात पदार्पण; पाय धुवून मोदींनी घेतले आशीर्वाद

IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास

सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची फसवणूक; ‘एवढ्या’ लाखांचा घातला गंडा

बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण