गुजरातमधील किटकनाशक कंपनीत भीषण स्फोट; ५ जण मृत्युमुखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुजरात, भरूच । गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मधल्या एका किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीत एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ३२ जण गंभीर जखमी झालेत. कंपनीत झालेल्या स्फोटामागचे कारण अजून समजू शकले नाही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेड’ या किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीच्या स्टोअरेज भागात दुपारी १२ वाजल्याच्या आसपास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवळपास १५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या स्फोटतील जखमींना भरुचच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं या भागातील लुवारा आणि लखिगाम गाव तसंच अदानी पोर्ट, पेट्रोनेट एलएनजी यांसारख्या कंपन्यांच्या कार्यालयांना रिकामं केलं आहे.

कंपनीत स्फोट होताच आग लागल्यानंतर संपूर्ण परिसर धुरानं भरून गेला होता. स्फोटाचा आवाज जवळपास २० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट ऐकू आल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या परिसरात इतर कंपन्यांच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment