हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Card : भारतात सध्या डिजिटल पेमेंटचा वापर खूप वाढला आहे. अनेक बँका देखील आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑनलाईन सुविधा देखील देतात.SBI कडून ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वेळोवेळी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देखील दिला जातो. आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही खूप वाढ झाली आहे. यावेळी देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा कल चांगलाच वाढला आहे. अशातच समजा अचानक आपले क्रेडिट कार्ड हरवले गेले तर खूप त्रास सहन करावा लागू शकेल.
कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजी असलेल्या कार्डांना तर पिनची देखील गरज नसते. ज्यामुळे अशा परिस्थितीत आपले क्रेडिट कार्ड कसे ब्लॉक करावे हे माहित असणे महत्वाचे आहे. आपले SBI Card आपल्याला अनेक प्रकारे ब्लॉक करता येईल. याची सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे SMS द्वारेही ते ब्लॉक करता येईल. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
अशा प्रकारे SMS द्वारे SBI कार्ड ब्लॉक करा
आपले SBI Card बँकेला पाठवूनही ब्लॉक करता येईल. त्यासाठी 5676791 वर BLOCK XXXX असे लिहून पाठवा. इथे हे लक्षात ठेवा कि, XXXX हे तुमच्या कार्ड नंबरचे शेवटचे 4 अंक असतील. तसेच क्रेडिट कार्ड मध्ये रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल क्रमांकावरूनच SMS पाठवला गेल्याची खात्री करा.
कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे 5,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन गरजेचा नाही
कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या कार्डमध्ये ‘टॅप अँड पे’ ची सुविधा देखील दिली जाते. यामध्ये कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट केले जाऊ शकते. कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे पिन न टाकताही 5,000 रुपयांपर्यंत पैसे देता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, आजचे नवे दर पहा
Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी??? त्याविषयी जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, आजचे नवे दर पहा
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!
PAN-Aadhaar Link : आता 30 जूनपर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर द्यावा लागणार दुप्पट दंड !!!