कराड परिसरात नाकाबंदी : बॅंक ऑफ इंडियाचे ATM फोडणारे चोरटे आणि पोलिसांच्यात सिनेस्टाईल झटापट, 3 पोलिस जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड – विटा मार्गावर असलेल्या गजानन हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणारे चोरटे आणि पोलिसाच्यांत सिनेस्टाईल झटापट झाली. यामध्ये चोरट्यांनी स्प्रे मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पोलिसांनी एकाला घटनास्थळारून ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी कराड शहर पोलिसांनी नाकाबंदी केली असून चोरट्यांचा शोध घेत आहेत. सदरची घटना आज सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1405786943237428

कराड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजाजन हाैसिंग सोसायटीत काही लोक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा संदेश वायरलेस ऑपरेटर याना प्राप्त झाला. यावेळी वायरलेस कर्तव्यावरील महिला अमंलदान यांनी पहाटे 02. 48 वाजण्याच्या सुमारास दामिनी मोबाईल व बीट मार्शल- 5 यांना गजानन हौसिंग सोसायटी जवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम काही लोक फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ दामिनी मोबाईल कर्तव्यावरील पोलिस हवालदार जयसिंग राजगे, पो. ना. पाटील तसेच बीट मार्शल-5 कर्तव्यावरील पो.ह. सचिन सूर्यवंशी आणि होमगार्ड निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तेथे चारजण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते.

घटनास्थळी पोलिसांना पाहताच चाैघांनी अंमलदारांच्या डोळ्यावर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या डोळ्यावरती स्प्रे मारलेला असतानाही, त्यांनी त्यामधील एका आरोपीस पकडून ठेवले व त्याही परिस्थीतीत पीसीआर मोबाईलला संदेश देऊन अतिरीक्त मदत मागितली. त्यानंतर पीसीआर मोबाईल मसपोनि सौ. शादिवान यांच्यासह पोलिस कर्मचारी सदर ठिकाणी गेले. डोळ्यावर स्प्रे मारलेला असतानाही सचिन अशोकराव वाघमोडे (वय- 38 वर्षे रा.आदर्श नगर, काळेवाडी, पुणे) यास पकडून ठेवले होते. तसेच त्यांची गुन्ह्यात वापरलेली एक होंडा ट्विस्टर मोटरसायकल क्रमांक (एमएच- 42- डब्ल्यू- 5441) कळ्या रंगाची ताब्यात घेतली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच संशयीतांना पकडण्यासाठी विभागात नाकाबंदी लावण्यास आलेली आहे.

ATM फोडताना चोरट्यांना पोलोसांनी सिनेस्टाईल पकडलं, बाँम्बचा स्फोट झाला अन् नंतर..

सदर कारवाईत पो.ह. जयसिंग राजगे, पो. ह. सचिन सूर्यवंशी व होमगार्ड निकम यांना त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारल्यामुळे त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. या घटनेचा अधिक तपास API श्री. गोडसे करीत आहेत.

Leave a Comment