व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात शिवरायांचा अवमान; Video पाहताच येईल संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांकडून ठीकठिकाणी जाहीर मेळावे घेत शक्ती प्रदर्शन केल जात आहे. मात्र याच दरम्यान, जळगावातील भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम संपताच प्रमुख नेतेमंडळी बाहेर पडत असताना काही कार्यकर्ते थेट व्यासपीठावर गेले. यावेळी गर्दीमुळे झालेल्या धक्काबुक्कीत स्टेजवरील एका कोपऱ्यात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा खाली पडली. सोशल मीडिया वर हा विडिओ वायरल झाल्यानंतर शिवप्रेमीनी संताप व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या विडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे. राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही. निषेध!” असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यामुळे आता शिवरायांच्या अपमानानंतर शिंदे गट पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.