हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लड कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. (blood cancer symptoms in marathi) अनेकदा आपल्याला ब्लड कॅन्सर आहे हे सदर व्यक्तीला खूप उशिरा कळत. कधी कधी तर वेळ निघून गेल्यानंतर या आजाराबाबत माणसाला माहिती होते. यावेळी उपचार करणे कठीण होऊन गेलेले असते. म्हणूनच आज आपण ब्लड कॅन्सर या आजाराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ब्लड कॅन्सरची लक्षणे आणि कारणे याबाबत माहिती घेणार आहोत.
ब्लड कॅन्सरची म्हणजे नक्की काय?
ब्लड कॅन्सरला ल्युकेमिया असेही म्हणतात. ल्युकेमिया हा रक्त कर्करोगाचाच एक प्रकार आहे. हा कर्करोग रक्त आणि अस्थिमज्जाशी संबंधित आहे. ब्लड कॅन्सर हा रक्तपेशींचा कर्करोग आहे. ल्युकेमिया, लिम्फोमा, मायलोमा यासह रक्त कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. हे सर्व कर्करोग वेगवेगळ्या रक्तपेशींशी संबंधित कर्करोग आहेत.
तसे पाहिले तर मुळात कर्करोग हा एक धोकादायक रोग आहे. एकदा का माणसाला कर्करोगाने ग्रासले कि काही काळानंतर उपचार करणे शक्य होत नाही. मात्र, या आजारावर वेळीच उपचार झाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. कॅन्सर झाल्यावर काही सुरुवातीची लक्षणे दिसतात, ज्याची सुरुवातीला काळजी घेतली तर त्यावर उपचार शक्य आहेत. चला तर मग जाणून घेऊया ब्लड कॅन्सरची कारणे आणि लक्षणे.
रक्त कर्करोग लक्षणे (blood cancer symptoms in marathi)
रक्त कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्णाला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यामध्ये रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होऊ लागते ज्यामुळे व्यक्तीमध्ये रक्ताची कमतरता असते. रक्त कर्करोगाच्या काही सामान्य लक्षणांमध्ये ताप, तीव्र थकवा, हिरड्या किंवा त्वचेतून रक्त येणे, पाठदुखी किंवा हाडे दुखणे यांचा समावेश होतो.
ताप येणे, थंडी वाजणे, भूक न लागणे, मळमळ होणे, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, हाड/सांधेदुखी, ओटीपोटात अस्वस्थता, डोकेदुखी, धाप लागणे, वारंवार संक्रमण होणे, खाज सुटणे किंवा त्वचेवर पुरळ उठणे, मान,अंडरआर्म्स किंवा मांडीवरील सूज येणे.
याशिवाय ब्लड कॅन्सरने पीडित व्यक्तीला वारंवार इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जेव्हा शरीरात ल्युकेमिया पेशी विकसित होतात, तेव्हा रुग्णाला तोंड, घसा, त्वचा, फुफ्फुस इत्यादींमध्ये संसर्गाच्या तक्रारी असू शकतात. (blood cancer symptoms in marathi)
ब्लड कॅन्सरची कारणे कोणती आहेत?
वृद्धत्व, कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली, धूम्रपान किंवा तंबाखू वापरणे, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम सारखे रक्त विकार, मागील कर्करोगाचा उपचार किंवा रेडिएशन थेरपीचा संपर्क, बेंझिन आणि इतर पेट्रोकेमिकल्स सारख्या विशिष्ट रसायनांचा संपर्क, डाउन सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये आनुवंशिक घटकांमुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.