कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तांबवे येथे जिल्हा परिषद सदस्य प्रदीपदादा मित्र परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात 151 तरुणांसह महिला व युवतींनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा प्रांताधिकारी उत्तम दिघे, परिषद सदस्य प्रदिप पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्नेहा हुंदारे, सह्याद्री कारखाना संचालक रामचंद्र पाटील, सुपने सरपंच अशोक झिंब्रे, ग्रामसेवक टी. एल. चव्हाण, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, यशवंतराव चव्हाण बल्ड बँकचे डॉ. संदिप यादव आदी उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, जिल्ह्यात तांबवे गाव हे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागात शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर घेऊन समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे. युवापिढी या वयात भरकटक असताना शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने रक्तदान शिबिर घेऊन हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तांबवे गावातील जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील व त्यांच्या युवक मित्र परिवाराचा आदर्श इतरांनी घ्यावा.
यावेळी ऍड. उदयसिंह पाटील यांनीही गावात राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिर उपक्रम बाबत युवकांचे कौतुक केले. प्रास्ताविक व स्वागत प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. सतिश यादव यांनी केले. आभार सूरज पाटील यांनी मानले.
नवरदेवाचे आधी रक्तदारन नंतर मांडवात
पाठरवाडी येथील पोलीस पाटील सागर यादव या नवरदेवाने लग्नापूर्वी रक्तदान करून आपल्या लग्नासाठी मंडपात प्रवेश केला. सकाळी 11 वाजता नवरदेव आपल्या लग्नाच्या गाडी, कुरवलीसह तांबवे येथील रक्तदान शिबीरात आला. त्यांच्या या निर्णयाचे ऍड. उदयसिंह पाटील यांनी काैतुक करून त्यांचा सत्कारही केला.
बीडीओ, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रक्तदान
कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार आणि सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहा हुंदारे यांनी दोघांनी प्रदिप दादा मित्र परिवारांच्यावतीने आयोजित शिबिरात रक्तदान केेले. दोघांनीही सलग दुसऱ्या वर्षी शिबिरात रक्तदान केले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला.