औरंगाबाद | निरंकारी जगतामध्ये 24 एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो याच दिवशी मंडळाचे पूर्व सद्गुरू बाबा गुरुबचन सिंह जी यांनी मानवतेसाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण विश्वभर रक्तदान शिबिरांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येत असते.
याच अनुषंगाने सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि 9 मे रविवार रोजी मंडळाच्या वाळुज शाखेतर्फे जागृत हनुमान मंदिर मोरे चौक, बजाजनगर मध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिर उद्घाटनाप्रसंगी उद्योजक हनुमान भोंडवे,वाळुज पत्रकार संघटनांचे अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे साहेब उपस्थितित होते.
रक्तदान शिबिरामध्ये 156 दात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. हे सर्व रक्तदान शासकीय विभागीय रक्तपेढी तर्फे संकलित करण्यात आले. घाटीत सुद्धा रक्ताचा खूप तुटवडा असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या सरकारी नियमांचे पालन करत झालेल्या या शिबिरामध्ये उस्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मंडळाचे विभागीय प्रमुख कन्हैय्यालाल डेब्रा व वाळुज शाखेचे मुखी शिवाजी कुबडेजी यांनी आभार व्यक्त केले.. या कार्यक्रमा साठी सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.