चहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का ? जाणून घ्या या मागचे सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्हला योग्य माहितीची गरज असते. पण आजकाल सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशीच एक बातमी काही दिवसांपासून वायरल होत आहे त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे कि चहा पिल्यावर तुम्ही कोरोना संक्रमण होण्यापासून वाचू शकता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे त्यामध्ये ‘खूप चहा प्या आणि पाजा, चहा पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी’ या शीर्षकाखाली दिवसातून ३ वेळा चहा पिला तर तुम्हला कोरोना होणार नाही असा दावा करण्यात येत आहे.

भारत सरकारच्या ट्विटर हँडल पीआयबी फॅक्टचेकने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबी फॅक्टचेकने याबाबत ट्विट करून याची माहिती दिली आहे.’एक बातमी सांगितली जात आहे की चहा पिण्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकतो आणि यामुळे संक्रमित व्यक्ती लवकर बरी होऊ शकते. हा दावा बनावट आहे. चहा पिल्यास कोविड – १९च्या संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

पीआयबी फॅक्टचेकने या अगोदर शनिवारी अजून एक बातमी खोटी असल्याचे म्हणले होते. ज्या बातमीमध्ये असा दावा करण्यात आला होता की सुपारीच्या पानाच्या सेवनाने कोरोना विषाणूचा बचाव होऊ शकतो आणि संक्रमित व्यक्ती देखील बरी होऊ शकते. पीआयबी फॅक्टचेकने सांगितले कि कोविड – १९ टाळण्यासाठी वारंवार हात धुणे, मुखवटे लावणे आणि शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे.

You might also like