लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील घरे, हॉटेल्स, मॅरेज हॉल, क्लिनिक, गेस्ट हाऊस, कोचिंग क्लासेस आणि इतर व्यावसायिक आस्थापनांकडून कचरा व्यवस्थापन शुल्क आकारणार आहे. या नव्या नियमांनुसार दरमहा 100 ते 7500 रुपये पर्यंत शुल्क लागू होणार आहे. यासंदर्भात बीएमसीने ड्राफ्ट तयार केला असून, 1 एप्रिल ते 31 मे 2025 पर्यंत नागरिकांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
कचरा व्यवस्थापनासाठी मोठा खर्च
बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रत्येक मुंबईकरासाठी बीएमसी वर्षाला 3141 रुपये खर्च करते, जो देशातील सर्वाधिक आहे. कचरा व्यवस्थापन खर्च भागवण्यासाठी आणि शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या करामुळे BMC ला दरवर्षी सुमारे 687 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
कोणाला किती शुल्क भरावे लागणार
घरगुती कचरा शुल्क
- 50 चौरस मीटरपर्यंतच्या घरांसाठी – 100 रुपये प्रति महिना
- 50 ते 300 चौरस मीटरपर्यंतच्या घरांसाठी – 500 रुपये प्रति महिना
- 300 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या घरांसाठी – 1000 रुपये प्रति महिना
व्यावसायिक व व्यावसायिक आस्थापनांसाठी शुल्क
- दुकाने, ढाबे, मिठाईची दुकाने, कॉफी हाऊस – 500 रुपये
- गेस्ट हाऊस – 2000 रुपये
- हॉस्टेल – 750 रुपये
- हॉटेल-रेस्टॉरंट (अतारांकित) – 1500 रुपये
- हॉटेल-रेस्टॉरंट (3 स्टारपर्यंत) – 2500 रुपये
- हॉटेल-रेस्टॉरंट (3 स्टारपेक्षा अधिक) – 7500 रुपये
- बँक, सरकारी ऑफिस, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस – 750 रुपये
- क्लिनिक, दवाखाने (50 बेडपर्यंत) – 2000 रुपये
- लॅब (50 चौ. मी. पर्यंत) – 2500 रुपये
- क्लिनिक, दवाखाने (50 बेडपेक्षा जास्त) – 4000 रुपये
- लॅब (50 चौ. मी. पेक्षा जास्त) – 5000 रुपये
- लघु व कुटीर उद्योग (10 किलो कचरा प्रतिदिन) – 1500 रुपये
- कोल्ड स्टोरेज, गोदामे – 2500 रुपये
- मॅरेज हॉल, फेस्टिवल हॉल, मेळावे (3000 चौ. मी. पर्यंत) – 5000 रुपये
- मॅरेज हॉल, फेस्टिवल हॉल, मेळावे (3000 चौ. मी. पेक्षा अधिक) – 7500 रुपये
नागरिकांनी आपली मते नोंदवा
हे शुल्क लागू करण्यापूर्वी 1 एप्रिल ते 31 मे 2025 दरम्यान नागरिक आणि व्यावसायिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवले जात आहेत. त्यामुळे मुंबईकरांना या नव्या शुल्काबाबत आपली मते मांडण्याची संधी आहे.
तुमचे मत काय
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम आवश्यक आहे की हा नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार आहे? तुमची प्रतिक्रिया BMC ला द्या आणि या निर्णयावर तुमचे मत नोंदवा.




