BMW X3 M40i लाँच; 250 KM टॉप- स्पीड, किंमत किती?

_BMW X3 M40i Launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने भारतीय बाजारात आपली नवीन लक्झरी कार BMW X3 M40i लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनने सुसज्ज असलेली ही कार कंपनीने ८६. ५९ लाख रुपयांच्या (एक्स शोरूम किंमत) किमतीत लाँच केली आहे. BMW ने या कारचे बुकिंग सुद्धा सुरू केले असून तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइटला भेट देऊन ही कार बुक करू शकता. तत्पूर्वी या लक्झरी कारचे खास फीचर्स आपण जाणून घेऊया.

दमदार इंजिन –

या लक्झरी कारमध्ये M TwinPower Turbo सह 3.0 लीटर 6 सिलेंडर इन लाइन पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ट्रान्समिशन आणि पेडल शिफ्टरसह येते. तसेच हे दमदार इंजिन 355 bhp ची पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार ही गाडी अवघ्या 4.9 सेकंदात ० ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तसेच या गाडीला ताशी 250 किलोमीटर पर्यंत टॉप स्पीड मिळतंय.

लूक आणि फीचर्स –

गाडीच्या लूकबाबत सांगायचं झाल्यास BMW ची एसयूव्ही खूपच स्पोर्टी दिसत आहे. गाडीमध्ये अडॅप्टिव्ह हेडलाइट्स, 20-इंच M लाइट अलॉय व्हील्स, M Sport ब्रेक कॅलिपर, M-स्पेशल किडनी ग्रिल्स, 12.3-इंच टचस्क्रीन सिस्टम, 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग असे अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत.

किंमत किती –

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, BMW X3 M40i ची X शोरूम किंमत 86.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने बुकिंगही सुरू केलं आहे. बीएमडब्ल्यूच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही एसयूव्ही 5 लाख रुपयांमध्ये बुक करू शकता.