हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Body Language) आपल्या आसपास अनेक माणसांचा वावर असतो. ज्यातील काही माणसं आपल्या मनाच्या अत्यंत जवळ असतात. त्यांच्याशी बोललं की, आपल्याला अगदी मोकळ झाल्यासारखं वाटतं. तर काही लोक आपल्याला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलणं सोडाच. त्यांच्यासोबत उठणं, बसणंदेखील आपल्याला मान्य नसतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक घटनांमागे हीच माणसं कारणीभूत असतात, असा आपला एक सामान्य समाज असतो. पण नीट लक्षात घेतले तर समजेल की, आपण एखाद्या व्यक्तीसोबत वर्षानुवर्ष संपर्कात असूनही त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहेत? हे पक्के ओळखू शकत नाही.
तोंडावर गोड मात्र मागून आपली वाईट पद्धतीने फसवणूक करणारी माणसं अनेकदा आपल्या जवळचीच असतात. मात्र, त्यांच्या गोड बोलण्यात फसल्यामुळे आपल्याला त्यांची कडवट मानसिकता समजून येत नाही. (Body Language) तसं पाहता एखाद्या माणसाच्या मनात आपल्याविषयी काय चालू आहे? हे समजणे जरा कठीणच असते. मात्र त्यांची देहबोली तुम्हाला त्यांचा खरा चेहरा दाखवू शकते, असे एका तज्ञांनी सांगितले आहे. खरंच जर एखाद्या माणसाच्या मनात आपल्याविषयी काय चालू आहे? हे समजलं तर जगणं किती सोप्प होईल. नाही का? यामुळे घर असो किंवा ऑफिस आपल्या सोबत वावरणारी व्यक्ती आपल्यासाठी कशी आहे? हे समजता येईल. तर आज आपण लोकांच्या नकली मुखवट्या मागील खरे चेहरे कसे जाणून घेता येतात? याविषयी काही खास गोष्टींची माहिती घेणार आहोत.
त्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे?
एखाद्याच्या मनात काय सुरु आहे? हे जाणून घेणे कठीण आहे. पण अशक्य नक्कीच नाही. कारण अनेकदा माणसाची देहबोली आणि आवाजातील वलय त्याच्या मानसिकतेचे प्रभावी प्रदर्शन करत असते. कोण कोणाबद्दल काय विचार करतं? हे त्याच्या आवाजाच्या टोनद्वारे समजू शकतं. (Body Language) यातही अनेक लोक विविध प्रकारे नाटक करून तुमची फसवणूक करू शकतात. पण त्यांचा आवाज आणि टोन बदलू शकत नाहीत. कारण ते जाणीवपूर्वक नियंत्रित करणे खूप कठीण आहे. याबाबत सर्वात महत्त्वाचे असे की, लोकांना अभिनय करण्यासाठी वेळ मिळण्याआधी आपण त्यांच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहे हे समजू शकतो.
ते हसणे मिश्किल आणि खोटे.. (Body Language)
अनेकदा आपण लोकांच्या गोड बोलण्यात आणि खास करून त्यांच्या गोड हसण्याने प्रभावित होत असतो. कुणाकडे पाहिले असता त्याने तुमच्याकडे पाहून गोड हास्य दिले तर आपण अगदी सहज विरघळून जातो. ही क्षणिक अभिव्यक्ती तुम्हाला आधी समजून घ्यावी लागेल. कारण, हे हसणे खोट असू शकते. महत्वाचे म्हणजे, अनेकदा बहुतेक हसणे हे खोटेच असते. पण ते आपल्या लक्षात येत नाही. अस्सल हास्य तेच जे अत्यंत दिलखुलास असेल.
तुमची गरज नाही
आपली देहबोली बरंच काही बोलून जाते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या व्यक्तीच्या देहबोलीचे बारकाईने निरीक्षण करा. अनेकदा तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्यात इंटरेस्ट नसतो. आपण मात्र उगाच गुरफटलेले असतो. उदाहरण द्यायचं तर, समजा तुम्ही त्या व्यक्तीसोबत उभे आहात आणि बोलत आहात. (Body Language) मात्र तिचे लक्ष भलतीकडे असेल. शिवाय हाताची आणि पायाची विनाकारण हालचाल नीट बघा. तुमच्याकडे पाहण्यात किंवा तुमच्याशी बोलण्यात त्या व्यक्तीला इंटरेस्ट नाही हे यावरून कळते. अर्थात ती व्यक्ती तुमच्या सोबत असण्याला किंवा बोलण्याला अर्थहीन समजते.
अपमानास्पद वागणूक
अनेकदा आपण ज्या व्यक्तीला हृदयाजवळचे स्थान देतो तिच्या बोलण्याने आपण जास्त दुखावतो. कितीही कठोर बोलले तरी आपण दुर्लक्ष करतो मनाला लागलेच नाही असे दाखवतो. पण खरंतर त्यांचे बोचरे बोल जिव्हारी लागत असतात आणि हे त्यांच्या लक्षात येत असत. म्हणून असे लोक तुम्हाला आणखी खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या रूपावर किंवा कामावर टिप्पणी करून ते तुम्हाला चार चौघात लज्जित करतात. (Body Language) तर अशावेळी तुम्ही तुमच्या स्वाभिमानाला जपा आणि वेळीच लांब व्हा. अन्यथा तुमचे हे प्रियजन तुम्हाला आयुष्यात कधी प्रगती देखील करू देणार नाहीत आणि मुख्य तुम्हाला सुखाने जगूनही देणार नाहीत.