हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षांचा होता. जगदीशच्या जाण्याने शरीरसौष्ठव वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोना किती भयंकर आहे याचा प्रत्यय वेळोवेळी येत आहे.
जगदीशने महाराष्ट्र श्री. स्पर्धेत तब्बल चार वेळा सुवर्ण कामगिरी केली तर, मिस्टर इंडिया या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने दोन वेळा सुवर्णपदक मिळवले. तर, जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य आणि कांस्यपदक आपल्या नावे केले. जवळपास 15 वर्ष व्यवसायिक खेळाडू म्हणून त्यांचं करिअर केलं आहे.
जगदीश लाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र कोरोनावर ते मात करू शकले नाहीत. जगदीश लाड यांना एक मुलगी असून ते तीन वर्षांपूर्वीच वडोदरा येथे स्थायिक झाले होते. तिथेच त्याचं निधन झालं
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.