Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood स्टार्स देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच गर्दी करतात. अनेकदा असे पहिले जात कि काही चाहत्यांकडून आततायीपणा केला जातो. अशा परिस्थितीत या स्टार्सना अशा फॅन्स आणि गर्दीपासून वाचवण्याचे काम त्यांचे बॉडीगार्ड करतात. हे बॉडीगार्ड या स्टार्ससोबत अगदी सावलीसारखे राहतात. ते सतत आजूबाजूला बारीक लक्ष ठेऊन असतात. अनेक मोठ्या स्टार्सच्या बॉडीगार्ड बाबत लोकांमध्ये कुतूहल देखील असते. चला तर मग बॉलिवूड स्टार्सच्या सर्वात महागड्या बॉडीगार्ड्सवर एक नजर टाकूयात …

सलमान खान – शेरा

सलमान खानचा बॉडीगार्ड असलेल्या शेराची लोकप्रियताही सलमान. शेराचे खरे नाव हे गुरमीत सिंग जॉली आहे. तो गेल्या 25 वर्षांपासून सलमानसोबत काम करत आहे. सलमान शेराला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागवतो.1998 मध्ये सलमान शेराची पहिल्यांदा भेट झाली होती. एका रिपोर्ट्सनुसार, सलमान खान शेराला दरवर्षी दोन कोटी रुपये मानधन देतो. Bollywood

3 times Salman Khan's bodyguard Shera made headlines for all the WRONG reasons - Bollywood News & Gossip, Movie Reviews, Trailers & Videos at Bollywoodlife.com

आमिर खान – युवराज घोरपडे

अभिनेता आमिर खानचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्याचा बॉडीगार्ड असलेल्या युवराजवर आहे. आमिरच्या सुरक्षेसाठी युवराज नेहमीच दक्ष असतो. आमिरकडून युवराजला दरवर्षी 2 कोटी रुपये मानधन दिले जाते. Bollywood

5 Highest Paid Bollywood Bodyguards: Shera, Ravi Singh, Shreysay Thele & More

शाहरुख खान- रवी सिंग

Bollywood च्या किंग खानची लोकप्रियता तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. शाहरुख जिथे जिथे जातो तिथे जिथे त्याच्या चाहत्यांची भरपूर गर्दी होते. अशा परिस्थितीत त्याचा बॉडीगार्ड असलेला रवी सिंग शाहरुखच्या मागे सावलीसारखा उभा राहतो. तो जवळपास नऊ वर्षांपासून काम करत आहे. रवी हा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या बॉडीगार्डपैकी एक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख दरवर्षी रवीला 2.7 कोटी रुपये मानधन देतो.

shahrukh khan bodyguard ravi singh salary: Ravi Singh is the most expensive bodyguard of Bollywood, take this much salary for Shahrukh Khan's security – eBioPic.com | Tech News, Reviews, Latest News from

अक्षय कुमार – श्रेयस ठेले 

Bollywood चा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा बॉडीगार्ड श्रेयस ठेले हा आहे. अक्षय कुठेही गेला तरी श्रेयस त्याच्या सुरक्षेवर बारीक नजर ठेवतो. अक्षयकडून श्रेयसला वर्षाला सुमारे 1.2 कोटी रुपये मानधन मिळते.

You will be shocked to know the salary of the bodyguards of these Bollywood stars! | Catch News

अमिताभ बच्चन- जितेंद्र शिंदे

Bollywood चे मेगास्टार असलेले अमिताभ बच्चन यांची फॅन फॉलोइंग किती आहे हे कोणालाही सांगायला नको. जगभरातील लोकांमध्ये अमिताभ खूप लोकप्रिय आहेत. अशा परिस्थितीत बिग बींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यासोबतच राहणाऱ्या जितेंद्र शिंदेच्या खांद्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ आपल्या बॉडीगार्डला 1.5 कोटी मानधन देतात.

Amitabh Bachchan's personal bodyguard Jitendra Shinde's salary is over Rs 1 crore! | Hindi Movie News - Times of India

हे पण वाचा :

ऋता दुर्गुळे पतीसोबत बीचवर सेलिब्रेट करतेय हनिमून; पहा फोटो

मौनी रॉयच्या मादक अदामुळे चाहते झाले वेडे

johny depp : खरंच… जॉनी डेप आपल्या वकिलासोबत डेट करतोय ??? पहा फोटो

Leave a Comment