कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील रेठरे खुर्द व नारायणवाडी येथे बोगस डॉक्टर म्हणून अटक केलेल्या दोघांकडून कसून चाैकशी सुरू आहे. तसेच दोघांच्याही बोगस दवाखाना चालवत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. यामध्ये सुदर्शन जाधव हा डाॅक्टर भावाचे निधन झाल्यानंतर चार वर्षांपासून भागात लोकांवर उपचार करत आहे, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, बोगस डाॅक्टर सुदर्शन जाधव यानेच नारायणवाडी येथे महिला बोगस डॉक्टर सुवर्णा मोहितेला पंत क्लिनिक दवाखाना चालवण्यास भाग पाडले. त्यानंतर रेठरे येथे सुदर्शन जाधव यालाही अटक करण्यात आली आहे. काल दिवसभर त्याच्या रुग्णालयात छापा टाकून पोलिसांनी अधिक तपास केला. दिवसभर मोहिते, जाधव यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला.
सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी हा छापा टाकला होता. तेव्हा त्यांनी कागदपत्रे ताब्यात घेतली असून दोघांचीही कसून चाैकशी सुरू आहे. त्यामध्ये अनेक खुलासे झाले असून अद्याप तपास सुरू आहे.