हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक ऑफ इंडिया (Bank Of India) हि देशातील सर्वात लोकप्रिय आणि कानाकोपऱ्यात पोचलेली राष्ट्रीय बँक असून या बँकेचे मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आहेत. तुम्ही सुद्धा बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीच्या अशा या बँकेने आपल्या FD वरील म्हणजेच मुदत ठेवी वरील व्याजदर वाढवले (BOI FD Rate Hike) आहेत. त्यामुळे पैशाची बचत आणि गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी हि मोठी फायदेशीर गोष्ट आहे. बँक ऑफ इंडिया ३ टक्के ते ८.३० टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहेत. आज आपण बँक ऑफ इंडियाचे नवे व्याजदर जाणून घेणार आहोत.
नवे व्याजदर खालीलप्रमाणे- BOI FD Rate Hike
7 दिवस ते 14 दिवस- 3 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
15 दिवस ते 30 दिवस- 3 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के
31 दिवस ते 45 दिवस – 3 टक्के: ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के
४६ दिवस ते ९० दिवस- ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५ टक्के
91 दिवस ते 179 दिवस – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५टक्के
180 दिवस ते 210 दिवस – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
180 दिवस ते 210 दिवस – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
211 दिवस ते 269 दिवस – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
270 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी- 6.80 टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
666 दिवस – 7.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ८.३० टक्के (BOI FD Rate Hike)
2 वर्षे – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के
3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी:- 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.00 टक्के