राजपथ इंन्फ्रावर तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई : साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| वैभव बोडके
औंध ते गोपूज रस्त्यावर आणि गोपूज गावच्या हद्दीत असलेल्या राजपथ इंन्फ्रा कंपनीने तब्बल साडे सहा कोटींचा महसूल बुडविला आहे. या कारणास्तव खटाव तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी किरण जमदाडे यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. संबंधित कंपनीच्या गौणखणीज साठ्यासह ते वाहतूक करणारी वाहने यापुर्वीच जागेवरच सिल केली होती. या बाबतची केस सुरू आहे, त्याचा निर्णय झालेला नसतानाही, संबंधित क्रशर चालकाने सिल केलेली वाहने बेकायदेशीरपणे, दांडगाईने सुरू केलेली होती. तहसिलदार यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर जावून हजेरी लावून सहा डंपर, एक पोकलेन सह डंपरची काही नविन टायर्स असा सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबधित राजपथ इंफ्रांच्या मालकाने शासनाने केलेल्या कारवाईस कोलदांडा दिला होता. याबाबतची माहीती मिळताच कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी शासनाची फसवणूक करत बुडविलेल्या महसुलाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजपथ इंन्फ्रावर अचानक धडाकेबाज कारवाई केली. शिवाय राजपथ इंन्फ्राचे कर्मचारी रूपनवर याच्यासह इतर तीन कर्मचारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आत्तापर्यंतची तालुक्यातील सर्वात मोठी जप्त मुद्देमालाची कारवाई केली आहे.

सदरच्या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा शासनाच्या नियमानुसार जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावातूनच शासनाची फसवणूक करत बुडविलेल्या महसुलाची वसुली करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सदरच्या कारवाईत तालुका न्यायदंडाधिकारी किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेसावळी येथील पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलिस हवालदार संतोष पाडळे, पोलिस हवालदार बापूराव जाधव, गोपनीय चे पंकज भुजबळ, महसूल विभागाचे गावकामगार तलाठी निनाद जाधव, प्रवीण कांबळे, गौरव खटावकर, गणेश पिसे यांनी सहभाग घेतला.