आमिरसाठी अक्षयने आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । यंदाच्या ख्रिसमसला अक्षय कुमारचा बच्चन पांडे आणि आमिर खानचा लाल सिंह चड्ढा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण आता ख्रिसमसला फक्त आमिर आणि करिना कपूरचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेच्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमार आणि चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी बॉक्स ऑफिसच्या शर्यतीतून स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः आमिरने ट्विटरवर याची माहिती दिली.

आमिरने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘अनेकदा बोलून प्रश्न मिटतात. माझे मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियावाला यांनी माझ्या विनंतीवर त्यांच्या बच्चन पांडे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली यासाठी दोघांचे आभार. त्यांच्या सिनेमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.’ अक्षय कुमारने माघार घेतल्यानंतर आता बच्चन पांडे सिनेमा पुढच्या वर्षी २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, अक्षय कुमारचा या सिनेमातील फर्स्ट लुकही समोर आला आहे. यात अक्षयने सोनेरी किनार असलेली काळ्या रंगाची धोती नेसली आहे. तसेच गळ्यात सोन्याच्या जाड चैन घातल्या आहेत.


View this post on Instagram

 

New look, new release date. Coming on 22nd January, 2021. In and as #BachchanPandey! #SajidNadiadwala @farhadsamji @kritisanon

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on Jan 26, 2020 at 10:30pm PST

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

विवोच्या ‘या’ फोनवर 14050 रुपयांची सूट, ट्रिपल कॅमेऱ्यासह 4500 mAh बॅटरी

ठरलं! IPL 2020 ची फायनल मुंबईतच, या दिवशी होणार अंतिम सामना

न्यूझीलंडमधील 11 वर्षाचा मुलगा जगातील सर्वात लहान बाप; वाचा सविस्तर

Leave a Comment