कोविड सेंटर उभारणीसाठी बॉलिवूड ‘बिग बीं’कडून कोट्यावधीची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून तिचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. तसेच अनेक कोरोना बाधितांना ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थतीत लोक प्रत्यकाकडे मदतीच्या आशेने पाहू लागले आहेत. दरम्यान अनेकजण स्वतःहून पुढाकार घेऊन गरजूंच्या मदतीला धावून आले आहेत. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. नुकतेच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वमर्जीने कोविड सेंटर उभारणीसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे.

दिल्ली येथील कोविड सेंटरसाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन अर्थातच चाहत्यांचे बिग बी यांनी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबतची माहिती दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्वीट करत, अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करुन विचारणा करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. ज्यात, पैशाची तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा! असे ते मला नेहमी सांगतात. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली’, असे म्हटले आहे.

गतवर्षीपासून कोरोना नामक विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील कित्येक कलाकारांनी कोरोनावर मात केली. तर काही दिग्गज व प्रतिभावंत व्यक्तिमत्वांना बॉलिवूड इंडस्ट्रीने गमावले. यात गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात करीत शासनाच्या इतर सर्व नियमांबाबत जागरूकता दर्शविली आहे. यासोबतच हे कलाकार मंडळी सातत्याने शासनाच्या नियमांचे पालन करा आणि मास्क लावा, आपले कुटुंब-आपली जबाबदारी याबाबत आवाहन करताना दिसतात.

Leave a Comment